खरेतर झाडांना किटकांची नेहेमीच त्यांच्या परागीभवनासाठी मदत होत असते त्यामुळे त्यांचे कायमच मित्रत्वाचे संबंध असतात. पण प्रत्येक गोष्टीला जसे अपवाद असतात तसेच याही बाबतीत आहेत. काही काही झाडे चक्क मांसाहारी असतात आणि त्यांना त्यांच्या खाण्यासाठी हे किटक लागतात. इतर वेळी झाडे प्राणि, पक्ष्यांना अन्न पुरवत असतात. मात्र या झाडांच्याबाबतीत हे उलटसुद्धा होते. काही विशिष्ट जातीच्या वनस्पती मात्र प्रकाशसंश्लेषणाद्वारे

किटकभक्षी वनस्पती ह्या इतर सर्वसामन्य वनस्पतींसारख्याच असतात आणि तशाच दिसतात. मात्र त्यांच्या काही खास क्लुप्त्या असतात ज्या त्यांच्या भक्षकाला सहज आकर्षित करतात आणि त्या नंतर त्यांना जखडणे, मारणे, त्यांचा जीवनद्रव शोषणे, पचवणे ह्या क्रिया सहज करतात. सर्वसामान्य वनस्पतींनासुद्धा किटकांना परागीभवनासाठी आकर्षित करण्यासाठी रंगीबेरंगी आणि विविध सुगंधी फुले असतात. जे किटक त्या झाडांना खातात त्यांच्यापासून बचावासाठी काही विषारी द्रव्ये, काट्यांसारखी आयुधे असतात. जमिनीतील पोषक द्रव्ये शोषण्यासाठी मुळे असतात. किटकभक्षी वनस्पतींना मात्र हेसुद्धा गुण असतात.
या प्रकारच्या वनस्पती जास्त पाउस असलेल्या थंड आणि ओलसर चिखल असलेल्या भागात आढळतात. आपल्याकडे ही वनस्पती भीमाशंकर, कास, आंबोली घाट अश्या ठिकाणी

आपल्याकडे या किटकभक्षी वनस्पतीच्या ड्रॉसेरा इंडीका आणि ड्रॉसेरा बर्मानी या दोन जाती आढळतात. ह्या वनस्पतीच्या पानांवर, फांद्यांवर चिकट असे आकर्षक, गोड वासाचे थेंब असतात. आता त्यांना पाने म्हणण्यात अर्थ नाही कारण ती काही इतर पानांसारखी पसरट नसतात तर ती जेमतेम काट्यासारखी केसाळ लव आलेली असते आणि त्यावर दवबिंदू पडल्यासारखे किटकांना आकर्षित करणारे चिकट थेंब असतात. याच कारणासाठी त्यांना “दवबिंदू”, “ड्यू ड्रॉप्स”, “सन ड्यू” अशी अनेक नावे आहेत. या त्यांच्या चिकट द्रावावर बारीकसारीक किटक आकर्षित होतात आणि त्याला चिकटतात. या नंतर झाड काही वेळा पानाला वळवून त्या किटकाला जखडून ठेवायचासुद्धा प्रयत्न करते. यानंतर झाडातून पाचक द्रव स्त्रवून त्या किटकाच्या शरीराचे विघटन करायला सुरवात करतात आणि थोड्याच वेळात त्याच्या शरीरातील उपयोगी असे सर्व जीवनद्रव शोषून घेऊन जेमतेम त्याचा सांगाडा बाहेर शिल्लक ठेवतात.
ड्रॉसेरा बर्मानी वनस्पतीची रचना तर एखाद्या फुलासारखी असते. या वनस्पतीचा आकार जेमतेम २/३ सें.मी. एवढाच असतो आणि ती अगदी जमिनीलगत सपाट वाढते. अगदी कमळाच्या फुलांच्या पाकळ्यासारखीच ती दिसतात. यांचा रंग आकर्षक गुलाबी, लाल असतो आणि त्यांच्या कडांना बारीक केस असून त्यावर ते किटकांना आकर्षणारे दवबिंदू असतात. १७३७ मधे श्रीलंकेमधे जोहान्स बर्मन या शास्त्रज्ञाने या वनस्पातीचा शोध लावला म्हणून ही “बर्मानी”. या बर्मानीची ती किटकभक्षी टोके अगदी १८०० अंशात दहा सेकंदाच्या आत वळून किटकाला पकडू शकतात
नुकताच कासला वन्य फुले बघायला गेलो असताना अगदी मुख्य रस्त्याच्या कडेलाच मी या वनस्पती शोधल्या. आम्ही ड्रॉसेरा इंडीका शोधत होतो कारण या काळात ती येते हे मला माहित

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com