ऑंखों ही ऑंखों मे !!!
निसर्गामधे डोळ्यांचे काम जरी जरी एकसारखे असले तरी आणि त्यांचा प्रमुख उद्देश जरी "बघणे" एवढाच असला तरी त्यामधे जातीनुसार प्रचंड वैविध्य आढळते. साधरणत: जरी प्राण्यांमधे आणि पक्ष्यांमधे डोळे दोनच असले तरी किटकांमधे, कोळ्यांमधे ते याहीपेक्षा कितीतरी संख्येने जास्त असतात. सध्यातर संशोधनाने असे सिद्ध झाले आहे की काही विशिष्ट्य पक्ष्यांच्या दोन्ही डोळ्यांची बघण्याची क्षमता त्यांच्या उपयोगाप्रमाणे कमी जास्त असते. याचाच अर्थ असा की हे पक्षी डाव्या डोळ्याने रंग ओळखू शकतात आणि उजव्या डोळ्याने हालचाल, वेग बघू शकतात. काही काही जातींच्या माश्यांमधे तर याहूनही चमत्कारीक दृष्टी असते. एका माश्याच्या डोळ्यांची रचना, वरचा अर्धा भाग वेगळा आणि खालचा अर्धा भाग वेगळा अशी केलेली असते. त्यामुळे जेव्हा हा मासा पाण्याच्या पृष्ठ्भागावर तोंड काढून पोहत असतो तेंव्हा त्याच्या डोळ्यांचे वरचे अर्धे भाग पाण्याच्या वर आकाशातून कोणी शिकारी पक्षी नाहीत ना असे बघत असतात तर पाण्याच्या खालच्या भागाचा, इतर छोट्या माश्यांना खाण्यासाठी, वेध घेण्यासाठी डोळ्यांचा खालचा भाग वापरला जातो. शॅमेलिऑनच्या डोळ्यांची तर अजुनच अजब तर्हा असते. त्याचे डोळे ज्या शंकुच्या आकाराच्या खोबणीत बसवलेले असतात त्या खोबणीच एकाच वेळेस वेगवेगळ्या दिशेला वळू शकतात आणि त्यामुळे त्याला एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या अगदी परस्परविरूद्ध दिशांनासुद्धा बघता येते. इतर प्राण्यांना इतरत्र बघताना मान, डोके फिरवायला लागते मात्र याच्या बाबतीत असे करायची त्याला गरजच उरत नाही. फक्त दोन डोळे वेगवेगळ्या दिशेला फिरवले की त्याचे काम होते.
पक्षी प्राण्यांच्या दोन डोळ्यांमधे एवढ्या गमती जमती आहेत तर किटकांच्या जगात या डोळ्यांच्या चमत्कारांची गणतीच नाही. आपल्या डोळ्यात दोनच भिंगे असतात तर किटकांमधील चतुरांच्या डोळ्यात ३०,००० भिंगे असतात. अगदी आलल्या घरमाशीच्या डोळ्यातसुद्धा ४,००० भिंगे असतात. याच कारणाकरता माशीला मारण्याकरता तुम्ही जेव्हा हात उगारता तेंव्हा ती हालचाल तीचे तिक्ष्ण डोळे लगेचच टिपतात आणि तिकडून ती पळ काढते. या त्यांच्या तिक्ष्ण दृष्टीबरोबरोच त्यांच्या डोक्याच्या बराचसा भाग ह्या गोलाकार डोळ्यांनी व्यापलेला असल्यामुळे त्यांना चक्क ३६० अंशाची नजर लाभलेली असते. आता या किटकांना हे अनेक भिंगांचे संयुक्त डोळे कमी पडतात की काय म्हणून जोडीला काही साधे डोळेसुद्धा असतात. या दोन्ही प्रकारच्या डोळ्यांनी त्या किटकाला प्रकाशाचे, समोरच्या वस्तूचे ज्ञान होते.
अगदी सुरवातीपासूनच मला मॅक्रो अथवा क्लोज अप छायाचित्रणाची आवड होती. त्यातसुद्धा प्राण्याचे, त्यातुनही छोट्या किटकांचे डोळे हा माझा आवडीचा विषय. बरोबरचे सगळे छायाचित्रकार जेंव्हा एखाद्या छान रंगीत फुलपाखराचे छायाचित्र घेत असायचे तेंव्हा मी मात्र त्याच्या समोर जाउन अगदी त्याच्या डोळ्यात घुसलेला असायचो. असाच एकदा एका फुलपाखराच्या डोळ्याचा अगदी क्लोज अप घेतला आणि नंतर जेंव्हा घरी येउन लॅपटॉप त्याचे छायाचित्र नीट बघीतले तेंव्हा कळले की त्या डोळ्यावर केस होते. यावर थोडी सखोल माहिती मिळवली तेंव्हा कळले की त्यांच्या डोळ्यात अतिसुक्ष्म असे केस असतात जे प्रकाशासाठी, हालचालींसाठी संवेदवाशील असतात. त्या "टाईट" क्लोज अप मुळे मला ती माहिती कळली. बऱ्याचशा पालींनी डोळ्यावर पापण्या नसतात त्यामुळे त्यांना डोळे साफ करण्याकरता वेगळीच युक्ती वापरावी लागते. या पालीच्या डोळ्याचा जवळून छायाचित्र घेताना तीने डोळे आपल्या जिभेने साफ करायला सुरवात केली आणि मला हे छायाचित्र मिळाले. सापांच्या डोळ्यांची पण छान छायाचित्रे मिळवता येतात. अर्थात जर नागासारखे, फुरश्यासारखे विषारी साप असतील तर खुप काळजी घेउन छायाचित्रण करावे लागते. मात्र एकमेव आडव्या डोळ्यांच्या बाहुल्या असणाऱ्या या हरणटोळाच्या डोळ्यांची मजाच काही न्यारी असते.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

No comments:
Post a Comment